Ramshej Fort
 

नाशिक - पेठ रस्त्यावर पंचवटीपासून १० किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. वनवासात असताना प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे अशी अख्यायिका आहे, म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेबाची १० हजाराची फौज रामशेजवर चाल करून आली, तेव्हा किल्ल्यावर केवळ ६०० मावळे होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल ६५ महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. मोगलांच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचला, किल्ल्याच्य तटबंदीची किंवा एखाद्या बुरुजाची पडझड झाली तरी किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते. तब्बल ६५ महिने रामशेज अजिंक्य राहिला व मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले.

 
 
चला तर गर्दीपासून दूर रामशेज या ऐतिहासिक स्थळी आणि अनुभवा किल्ल्याची महती,
गावाकडील निसर्गरम्य समृद्ध वातावरण आणि मन प्रफुल्लीत करणारा रानवारा.
 
   
 

🌴🌴 निसर्गरम्य वातावरणात 🌴🌴
फॅमिली - ग्रुप स्टे / कॅम्पिंग / डे पिकनिक
घरगुती फ्रेश पारंपारिक शुद्ध शाकाहारी न्याहारी, जेवण


बैलगाडी सफर, किल्ला बनवणे, पतंग उडवणे, नेमबाजी व इतर अनेक पारंपारिक खेळाचा मनसोक्त आनंद घ्या.

बुकिंगसाठी संपर्क : प्रशांत मोहोळे ☎️ 9420616105

मोहोळे वाडा, रामशेज

👍 फॅमिली - ग्रुप डे पिकनिक, गेट टुगेदर, कार्यक्रम तसेच स्टे / कॅम्पिंग साठी उत्तम व्यवस्था ‼️

♨️महाराष्ट्रीयन थाळी, पुराण पोळी थाळी, भरली वांगी / झुणका / शेवभाजी भाकरी, भाजणी थालीपीठ, कांदा भजी, मिसळ पाव अशा पारंपारिक शुध्द शाकाहारी पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्या ‼️

 
 
 
 
 

  Tourist Places near Hotel Mohole Wada, Ramshej

  Ramshej Fort - 0 km

  Dehergad Fort - 6 km

  Chamarleni Jain Caves - 5 km

  Panchavati Nashik - 10 km

  Saptashringi Devi Temple, Vani - 45 km

  Saputara - 70 km 
 

Contact : Mr. Prashant Mohole 9420616105